विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड’ला अभूतपूर्व प्रतिसाद, ‘हे’ आहेत विजेते….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड ‘ स्पर्धेत बारा ते सोळा वयोगटातील पुरुष गटात शावेश चव्हाण (यवतमाळ) व महिला गटात लावण्या नागरकर (चंद्रपूर) हे प्रथम आले. सतरा वर्षांवरील पुरुष गटात प्रशित थेटे (भातुकली, अमरावती) व महिला गटातून रिया दोहदरे (नागपूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या चारही विजेत्यांना पाच हजार रुपये रोख, सन्मानपदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बारा ते सोळा वयोगटातील पुरुष गटात अवनीश यादव (चंद्रपूर) व महिला गटात तेजस्विनी कामडे (चंद्रपूर) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर सतरा वर्षांवरील पुरुष गटात राजन यादव (नागपूर) व महिला गटात मिताली भोयर (नागपूर) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बारा ते सोळा वयोगटातील पुरुष गटात पियुष सोनवणे ( नागपूर) व महिला गटात रीता तरारे (हिंगणा, नागपूर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर सतरा वर्षांवरील पुरुष गटात दीपक प्रसाद (चंद्रपूर) व महिला गटात तृप्ती पटले (नागपूर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व विजेत्यांना द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके आणि सन्मानपदक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यातील आठशेच्या वर धावपटू सहभागी झाले.

सकाळी सात वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांचे अध्यक्षतेखाली वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते आझादी की दौड स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड्.लक्ष्मणराव भेदी, सहसचिव अशोकराव सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र बरडिया ,उमापती कुचनकार, लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर,वणी लाॅयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष शमीम अहमद, माजी सचिव महेंद्र कुमार श्रीवास्तव, माजी कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे , उपप्राचार्य प्रा.सुनील पावडे, वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य दीपा परिहार , स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे विचारपीठावर उपस्थित होते. “आजच्या स्पर्धेच्या युगात सक्षम व सृदृढ तरुणांची गरज आहे.बुद्धिमान व सुदृढ तरुण या देशाचे उज्ज्वल भविष्य घडवीत आहेत,असे तरुण घडवणाऱ्या आझादी की दौड स्पर्धेसारख्या उपक्रमांचे कौतुक केले पाहिजे” असे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी केले.

स्पर्धेचे संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण तथा क्रीडा विभागाचे संचालक प्रा.उमेश व्यास यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका कथन केली .प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालक डॉ.मनोज जंत्रे यांनी केले.वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल मुख्याध्यापक प्रशांत गोडे आभार मानले.

विदर्भस्तरीय आझादी की दौड स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयातील शारिरीक शिक्षक प्रा.कमलेश बावणे, वणी लायन्स हायस्कूल येथील शारीरिक शिक्षक शहजाद हुसैन , शेखर घुगूल राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा.किशन घोगरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांचेसह राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी आणि दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शहरातील क्रीडा संघटनांनी अथक परिश्रम केले.

Comments are closed.