बाबा ताजोद्दीन उर्सला थाटात सुरूवात;;;;

आज सकाळी 'शाही लंगर', महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन

0
विवेक तोटेवार, वणी: संत हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन यांचा जन्मोत्सवाला वणीत थाटात सुरुवात झाली आहे. वणीतील हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन दरगा (चिल्ला) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काल गुरुवारी दिनांक 4 ऑक्टोबरला दुपारी 1-5 या दरम्यान ‘कुराणखानी’चे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रेषित मोहम्मद यांना परमेश्वराने दिलेल्या दिव्य संदेशांचे पठण करण्यात आले.
आज शुक्रवारी दिनांक 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता शाही लंगर म्हणजेच  महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केली आहे. हा उर्स रविवार पर्यंत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैय्यद बाबा ताजोद्दीन उर्स कमेटी चे अध्यक्ष जुबेर खान उपाध्यक्ष सैय्यद रविश, सचिव तौसिम खान, शेख शाहिद, तौफिक शेख, मोबिन शेख (पिर साहब) यांच्यासह मार्गदर्शन म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते भरत ठाकूर, न. प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इजहार शेख, नगरसेवक निलेश होले, नगरसेविका प्रीती बिडकर तसेच कमेटीचे सदस्य परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी मोहसिन खान, इम्रान खान, मुबारक शेख यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या सालाना उर्स शरीफमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा ला़भ घ्यावा असे आवाहन संजोयक डॉ. महेंद्र लोढा आणि सैय्यद बाबा ताजोद्दीन र.अ. दर्गाह उर्स कमेटीद्वारे करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.