बाईपण भारी देवा सुजाता थिएटरमध्ये अवघ्या 70 रुपयांमध्ये.. रविवारी सकाळी 10 चा शो….

बहुगुणी डेस्क, वणी: सुजाता थिएटरमध्ये आज रविवारी दिनांक 30 जुलै रोजीचा सकाळी 10 चा बाईपण भारी देवा हा सिनेमाचा शो अवघ्या 70 रुपयांमध्ये बघता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या रोज सकाळचा शो हा बाईपण भारी देवाचा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर प्रेक्षकांना चार शो मध्ये रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा सिनेमा पाहता येणार आहे. 

सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चांगलाच गाजतोय. केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. महिला संपूर्ण थिएटर बुक करीत असून सध्या थिएटरमध्ये त्यांचा चांगलाच राडा पाहायला मिळत आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 40 करोडचा पल्ला पार केला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये शुक्रवारी 21 जुलैपासून हा सिनेमा रोज चार खेळात पाहता येणार आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukunya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब चौधरी (Deepa Parab) या साऱ्यांनीच कमाल केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे आणि लेखिका वैशाली नाईक यांनी साधा सरळ पारिवारिक ड्रामा प्रेक्षकांसमोर मांडला आहे जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो. वेगवेगळ्या वयोगटातील, भिन्न भिन्न मानसिकता, परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांचं वर्णन लेखिकेने लिहिलं आहे. चित्रपटात कथा, उपकथानकांचा मोठा गोतावळा आहे. चित्रपट बघताना सहा अभिनेत्रींची जुगलबंदी बघायला मिळते या सहाही बहिणींचे वेगळे वेगळे स्वभाव आहे. कोणाचं कोणाशी पटत नाही.

या बहिणींच्या आयुष्यातील संघर्ष बघायला मिळतो. वंदना गुप्ते, यांनी बऱ्याच वर्षांनी अभिनयाची एकहाती भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी कथानकाचा आधार आहे. सुकन्या मोने यांची एनर्जी दिसून येते. तर दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर या दोन वेगळ्या स्वभावाला दर्शवतात. कला दिग्दर्शकाने छान चित्रपट दिला आहे. चित्रपटाचे संवाद आणि पटकथा उत्तम आहे. तांत्रिक बाजू भक्कम दिसली आहे. साई पियुष या जोडीचं संगीत आणि मयूर हरदासांचे संकलन वासुदेव राणेंचा कॅमेरा उत्तम आहे. कुटुंबियांसह या चित्रपटाचा आनंद घेण्यासारखा हा चित्रपट आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.