बैलमपूर येथील युवकाची विष प्राषन करून आत्महत्या
सोशल मीडियावर काहीतरी घडल्याची परिसरात चर्चा
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बैलमपूर येथील २२ वर्षीय तरुण युवक अजेय गुलाब टेकाम याने गावाजवळीलच गणपत तुमराम यांच्या शेतात १४ मार्चला रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १५ मार्चला पहाटे गावातील नागरिक जात असताना रस्त्यालगत असलेल्या शेतात कुणीतरी असल्याचे आढळले पाहणी केली असता सदर युवक गावातीलच अजेय गेडाम असल्याची ओळख झाली यावरून गावकऱ्यांनी मृतकाच्या घरी माहिती दिली.
यावरून मृतकाचा मामा सतीश मडावी याने सकाळी ८ वाजता पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलीस घटनास्थळी पोहचली असता मृतकाच्या तोंडातून फेस निघालेल्या अवस्थेत आढळला तर त्याच्या बाजूला विषारी औषधीचा खाली डबा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवला.
मृतक अजेय टेकाम यांनी मरण्यापूर्वी चिठी लिहून ठेवल्याची चर्चा असून याच्या मृत्यूवरून वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरून काही घटना घडल्याची सुद्धा चर्चा गावकऱ्यांमध्ये परिसरात ऐकला मिळत आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मारोती टोंगे करीत आहे.