बालाजी जिनिंग आग: दोन्ही पंचनाम्यात ९०० क्विंटलची तफावत

वेगवेगळ्या आकड्यामुळे संशय व्यक्त

0

सुशील ओझा, झरी: कापूस जळल्याचा पंचनामा पटवारी राणे यांनी केला असून यात १५०० क्विंटल कापूस जळल्याचे दाखवण्यात आले आहे. तर पोलीस जमादार टोंगे यांनी ६०० क्विंटल जळल्याचा पंचनामा केला आहे. दोन्ही विभागाच्या पंचनाम्यात एवढी तफावत का ज्यामुळे दोन्ही पंचनाम्यावर संशय व्यक्त होत आहे. जिनिग मध्ये कापूस १५० क्विंटलच्या वर जळाला नसताना १६०० क्विंटल जळल्याची तक्रार देऊन कोट्यवधींचा घोटाळा केल्या जात आहे. तरी ग्रेडर, जिनिंग मालक व असिस्टंट म्हणून नेमणूक केलेले दोन्ही ग्रेडर यांची कसून चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.

बालाजी जिनिंग मध्ये १४६० क्विंटल कापूस असतांना पोलीस स्टेशनला तक्रारीत १६०० क्विंटल जळल्याची खोटी तक्रार देण्यात आली. जिनिग मध्ये कमी कापूस असताना १६० क्विंटल जास्तीचा कापूस आला कुठून असा ही प्रश्न उपस्तीत होत आहे. याचा अर्थ १६० क्विंटल कापूस जळाला व १६०० क्विंटल तर दाखवत नाही ना ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

शेतकऱ्यांचा कापूस खाजगी व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम व्यापारी व दलाल करत आहे. याला आळा बसावा व शेतकऱ्यांनाच्या कापसाला योग्य भाव मिळावा याकरिता शासनाची संस्था सीसीआय मार्फत कापसाची खरेदी केली जाते. परंतु यातही व्यापारी दलाल हे सीसीआय खरेदी करणाऱ्या ग्रेडरला हाताशी धरून खासगी खरेदी केलेला कापूस वेगवेगळ्या शेतकऱ्यांनाच्या सातबाऱ्यावर टाकून लाखो रुपये कमवीत आहे.

शेतकऱ्यांच्या चांगल्या दर्जेचा कापूस मध्ये पाणी आहे, कवडी आहे, खराब आहे असे कारणं सांगून त्यांचा कापूस रद्द करुन खासगी जिनिंगमध्ये कमी दरात विकण्यात भाग पाडत आहे. दलाल व व्यापा-यांचा खराब (कवडी) कापूस रात्री पैसे घेऊन खाली करीत असल्याचा गोरख धंदा जिनिंग मध्ये सुरू असल्याची तक्रार शेतकरी आहे. याबाबत अनेकदा शेतकऱ्यांचे वाद ग्रेडर सोबत झाले व चक्काजाम सुद्धा करण्यात आले.

सीसीआयची खरेदी शेतकऱ्यांनाच्या हिता करिता आहे की व्यापारी व दलालांच्या हिता करिता असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. सीसीआयच्या ग्रेडरने मुकुटबन येथील जिनिंगमध्ये दोन तरुण ग्रेडर म्हणून नेमणूक केली ज्यांना कापसाची एबीसीडी सुद्धा समजत नाही या तरुणांनी फक्त शेतकऱ्यांनाचा छळ केला असून अनेक शेतकऱ्यांनाच्या कापसाला रद्द करण्याचे काम केले. या असिस्टंट तरुणांची नियुक्ती सीसीआयने केली का? ग्रेडरला अश्या तरुणांना नियुक्त करण्याचे अधिकार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

नवशिक्या तरुणांनी रद्द केलेल्या कापसाच्या गाड्या खाजगी जिनिग मध्ये विकून जिनिग मालकाचा लाखोचा फायदा करून दिला आहे. तर शेतकऱ्यांनाचे लाखोंचे नुकसान केले आहे. बालाजी जिनिग मध्ये व्यापारी व दलाल यांचा कवडी कापूस ५३०० प्रमाणे घेऊन  शासनाचे कोट्यवधीचे नुकसान सदर ग्रेडर व जिनिग मालकाने केले आहे.

ग्रेडर व जिनिंग मालकाने स्वतःचे लाखो रुपयांचा फायदा केला आहे. हाच घबाड लपविण्याकरिता जिनिंग मध्ये आग लावून जास्त भावात खरेदी केलेला खराब कापूस जाळून चांगला कापूस जळाल्याचे दाखविण्यात येत असल्याची ओरड शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.