आजपासून बाजोरिया लॉनमध्ये बळीराजा व्याख्यानमाला

सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत रंगनाथ पठारे प्रमुख वक्ते

बहुगुणी डेस्क, वणी: आजपासून वणीतील बाजोरीया लॉनमध्ये बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे 10 वे वर्ष आहे. यावर्षी प्रख्यात साहित्त्यिक व व्याख्याते रंगनाथ पठारे हे प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यानमालेत येणार आहेत. आज आणि उद्या अशा दोन दिवस ही व्याख्यानमाला रंगणार आहे. या व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव महोत्सव समितीच्या वतीने आवाहन केले आहे.

शनिवारी संध्याकाळी 6 वाजता रंगनाथ पठारे यांचे सामाजिक वास्तव काल, आज आणि उद्या या विषयावर विचारमंथन होणार आहे. रामचंद्र सपाट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. रमेश सपाट यांच्या सौजन्याने पहिले स्मृतीपुष्प गुंफले जाणार आहे. शिव मोहत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे. पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, न्यू माजरी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी धोटे, सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र पाटील, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राम कात्रे, विधिज्ञ ऍड. विजया मांडवकर-शेळकी, न. प. शाळा क्रमांक ९ च्या मुख्याध्यापिका वेणू कोटरंगे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

२९ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता सांबशिव देवडे यांच्या स्मृतप्रित्यर्थ राजेंद्र देवडे यांच्या सौजन्याने दुसरे स्मृतिपुष्प गुंफले जाणार आहे. साहित्य कशासाठी या विषयावर यावेळी विचार मंथन होणार आहे. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, एसडीपीओ गणेश किंद्रे, डीएव्ही स्कुल सुंदरनगरचे प्राचार्य मनोज कारेमोरे, एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर, एनबीएसएस वुमेन्स लॉ कॉलेज बुरांडाच्या प्राचार्य ऍड. हमिरा शरीफ, विवेकानंद विद्यालयाचे से.नि. पर्यवेक्षक प्रविण इंगोले, आदिवासी प्रबोधन मंचचे संस्थापक सुभाष आडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरात आयोजित या दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेत प्रख्यात साहित्यिक व व्याख्याते रंगनाथ पठारे यांचे जीवनाला दिशा देणारे विचार ऐकायला मिळणार आहेत. तेंव्हा या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन शिव महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत, निमंत्रक कृष्णदेव विधाते व शिव महोत्सव समितीने केले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता महाराष्ट्र सरकारने स्थापित केलेल्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष राहिले आहेत. आता पर्यंत त्यांच्या १४ कांदबऱ्या व ८ लघुकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन करून पिच. डी. केली आहे. रंगनाथ पठारे यांच्या प्रकाशित साहित्याला साहित्य विश्वातील नामांकित संस्था व महाराष्ट्र शासनाचे देखील पुरस्कार मिळाले आहेत. 

Comments are closed.