विवेक तोटेवार, वणी: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात लावण्यात येणार टॉवरचा मोबदला देण्यास खाजगी कंपन्या प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न आता शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी उचलून धरला आहे. बळीराजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमदार बाळू धानोरकर व सर्व पीडित शेतकरी आमरण उपोषन करणार असल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी 5 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
बळीराजाच्या शेतात उभारण्यात येणाऱ्या विधुत टॉवरचा मोबदला हा ठरलेल्या किमातीनुसार देण्यात येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे. खाजगी कंपनीचे ठेकेदार हे बळजबरीने व काही वेळा दमदाटी देऊन शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर लावतात. परंतु ज्याच्या शेतात हे टॉवर उभारण्यात येते त्या शेतकऱ्याला नियमानुसार रक्कम मात्र देण्यात येत नाही. जमिनीची मोजणी, टॉवर ला लागणारी जागा, शिवाय हे काम उन्हाळ्यात करावे की ज्यामुळे पिकाचे नुकसान होणार नाही. अशा काही अटींचे पालनही संबंधित कंपन्यांकडून करण्यात येत नाही. अशाप्रकारचे अनेक तक्रारी चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून बाळू धानोरकर यांनी आपली कंबर कसली व शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले.
शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या पुढे ठेवून बाळू धानोरकर यांच्या मागण्या जर 10 ऑक्टोबर पर्यंत मान्य न झाल्यास सर्व बाधित शेतकऱ्यांना घेऊन चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. चंद्रपूर सोबत यवतमाळ जिल्ह्यातही कारवाही करण्यात यावी. व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी उचालून धरली.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात अशाप्रकारच्या 16 गावाचा समावेश आहे. तर मारेगाव तालुक्यातील 5 गावात अशाप्रकारचे मनोरे उभारून त्याबाबतचा मोबदला मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही. या गंभीर विषयाबाबत अनेकदा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परंतु या खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्यास सरकार जाणून विलंब करीत असल्याचा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे.
तालुक्यातील बेसा गावातून आलेल्या हेपट नावाच्या शेतकऱ्याने अशाप्रकरनि आपली व्यथा या पत्रकार परिषदेत सांगितली. त्यांच्या शेतात टावरची उभारणी करण्यात आली. परंतु 1 लाख 60 हजार रुपयांची बोलणी झाल्यानंतर 1 लाख 14 हजारच रुपये देण्यात आले. हेपट सारखे दुसरेही शेतकऱ्यांवर असा अन्याय झाला असेल. म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या मागण्या घेऊन आमदार बाळू धानोरकर अनेक शेतकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसणार आहे.