विवेक तोटेवार, वणी: रावण हा आदिवासी समाजाचे आद्य दैवत असल्याने दस-याला रावणाचे होणारे दहन रोखण्यात यावे, अशी मागणी आदिवासी संघटनांतर्फे करण्यात आली. याबाबत मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की रावण हा आदिवासी समाजासाठी आदर्श व्यक्ती आहे. ते आदिवासी समाजाचे आद्य दैवत आहे. रावण दहण प्रथेमुळे आदिवासी समाजाच्या भावनांना दुखावल्या जातात. त्यामुळे सार्वजनिक तथा गावा शहरातील गल्लीबोळातून होणारे रावण दहन बंद करावे.
चुकीचे प्रथा परंपरेमुळे आदिवासींच्या धार्मिक भावनांचे हनन करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल करावे व ही चुकीची प्रथा थांबवण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना अखिल भारतीय संविधानिक परिषदेचे गीत घोष, अशोक नागभिडकर, कृष्णा मडावी, अनिल गेडाम, अशोक दुर्गमवार, रमेश मडावी, भालचंद्र तोडकर, संतोष चांदेकर, ज्ञानेश्वर सालुरकर यांच्यासह आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)