वाजंत्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी

बॅन्ड व्यावसायिक व वादकांवर उपसमारीची पाळी

0

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनचा मोठा फटका बॅन्ड व्यावसायिकांना बसला आहे. संपूर्ण सिजन लॉकडाऊनमध्ये गेल्याने बॅन्ड व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासारखी यवतमाळ जिल्हयातही बॅन्ड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन बॅन्ड व्यवसायिकांनी केली आहे.

जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मांग व आदिवासी समाज परंपरेनुसार वाजंत्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. हा व्यवसाय मुख्यत: मार्च, एप्रिल, मे, जून असा चार महिने असतो. हा व्यवसाय सिजनेबल असल्याने याच सिजनमध्ये कमाई होते. मात्र आता लॉकडाऊनमध्ये वर्षभराच्या कमाईवर गदा आली आहे. अनेक लोकांनी लोकांनी बचत गट काढलेले आहे. बँकेचे कर्ज ही काढलेले आहे. हे कर्ज भरण्यासाठीही काही काम नसून. गटाचे पैसे आणि बँकेच्या कर्जाचे हफ्ते कसे भरावे हा प्रश्न आहे.

वर्धा जिल्ह्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातसुद्धा व्यवसाय चालू करण्याची परवानगी देण्यात यावी. कमीत कमी ६ ते ७ मानसाचे बॅन्ड पथकास मंजुरी दिली तर बॅन्ड व्यवसायिक व बॅन्ड वादक कलाकारांचे कुटुंब उघड्यावर येणार नाही. मांग व आदिवासी समाज तसेच बॅन्ड व्यवसायीक व बॅन्ड वादक कलाकारांची हलाकीची परिस्थिती पाहता तात्काळ शासकीय मदतीची घोषणा करावी व व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवेदन देतांनी नटराज, इंडीया, माँ दुर्गा, आर्यन, जगन्नाथ, राजदिप, एस कुमार, कैलास, राजकृष्ण व महाकाली बॅन्ड चे संचालक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.