श्रमदानातून पैनगंगा नदीवर बंधारा
रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन येथील सरपंच यांनी उन्हाळ्यात गावातील जनतेला पाण्यासाठी भटकावे लागू नये याकरिता पैनगंगा नदीवर सिमेंट पोते बांध टाकण्यात आला. या वर्षी पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई भासणार आहे. याची कल्पना ग्रामपंचायतीला आतापासुनच असल्यामुळे सरपंच शंकर लाकडे यांच्यासह सर्वच ग्रामस्थ बांध बांधण्यासाठी समोर आले.
मुकूटबन येथील पाण्याची नळ योजना पैनगंगा नदीतील परसोडा पात्रावर अवलंबुन आहे. फेब्रुवारी महीन्यांपासून पाण्याची टंचाई जाणवु शकते. त्यामुळे गावातील जनतेला पाण्यासाठी भटकावे लागू नये याकरिता आतापासुनच पैनगंगा नदीवर पोत्यात रेती भरून बंधारा बांधण्यात आला. त्यांच्या ह्या कार्याचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत च्या सरपंचांनी व सदस्यांनी बोध घ्यावा असे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
बंधारा बांधताना सरपंच लाकडे सह उपसरपंच अरुण आगुलवार ,संदीप विचू, मधुकर चलपेलवार, अशोक कल्लूरवार, किशोर गोंनलावर आणि समस्त ग्रामपंचायत कर्मचारी होते.