दुचाकीच्या डिक्कीतून बँकेच्या पासबुक व रोख रकम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : डेली कलेक्शनचा काम करणाऱ्या बँक प्रतिनिधिची मोपेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काही वेळाने चोरलेली मोपेड गणेशपूर येथील पुलिया जवळ आढळली. मात्र मोपेडच्या डिक्कीतून चोरट्यांनी बँकेच्या पासबुक व रोख रक्कम लंपास केली. दिनांक 13 आगस्ट रोजी रात्री 9 वाजता दरम्यान राजीव गांधी चौकात ही घटना घडली.

फिर्यादी सुनील गणपत ठाकरे (50) रा. गुरुवर्य कॉलनी वणी हा बँकेत डेली कलेक्शन प्रतिनिधि आहे. दररोज प्रमाणे तो 13 आगस्ट रोजी राजीव गांधी चौकात एका किराणा दुकाना समोर त्याची स्कूटी पेप मोपेड क्रमांक MH29 AQ 5029 उभी करून दुकानात पैसे आणण्याकरिता गेला. पैसे घेऊन परत आल्यावर स्कूटी ठेवलेल्या जागेवर आढळली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही स्कूटी मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादी सुनील ठाकरे हा मोपेड चोरी गेल्याची तक्रार द्यायला वणी पोलीस ठाण्यात गेला.

दरम्यान त्याची स्कूटी गणेशपूर येथील पुलिया जवळ टाकून असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यावरून त्यांनी जाऊन पहिले असता स्कूटी पुलियाच्या बाजूने टाकून होती. स्कूटीची डिक्की खोलून पाहिली असता त्यात प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये बांधून ठेवलेल्या बँकेच्या 7-8 पासबुक व रोख  4 हजार रुपये दिसून आले नाही. दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यानी बँकेच्या पासबुक व  4 हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी सुनील ठाकरे यांनी वणी पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली. त्यावतून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.