जॉब अलर्ट – जय जगनाथ मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीत भरती

13 जूनला वॉक-इन इंटरव्यू... बँकिंगमध्ये रुची असणाऱ्यांसाठी रोजगाराची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: बँकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी जय जगनाथ मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वणी यांच्या वतीने भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संस्थेत Junior Banking Associate (JBA) या पदासाठी एकूण 5 जागा भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांसाठी 13 जून रोजी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय रामचंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उपलब्ध जागांपैकी 4 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 1 जागा महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच एमबीए पदवीधारक, मार्केटिंग व बँकिंग क्षेत्रात रुची असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांमध्ये उत्तम संवाद कौशल्य, टीमवर्क, व्यावसायिक दृष्टिकोन तसेच ग्राहक सेवा व मार्केटिंगची आवड असणे अपेक्षित आहे.

वॉक-इन मुलाखत 13 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) संस्थेच्या jjm.jjms16@gmail.com ई-मेलवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचे कार्यालय रवि मेडिकलच्या बाजूला, छत्रपती शिवाजी चौक (टिळक चौक), वणी येथे असून अधिक माहितीसाठी 8888323673 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी शोधणाऱ्या पात्र आणि उत्साही युवक-युवतींसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे.

Comments are closed.