‘बाप्पा माझा स्पर्धा 2025’ वणीत उत्साहात पार पडली

घरघुती व सार्वजनिक गणपती स्पर्धेत विजेत्यांचा गौरव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पार्टी वणी शहर मंडळातर्फे 27 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर दरम्यान ‘बाप्पा माझा स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले. ‘स्वदेशी वापरा देश वाचवा’ आणि ‘सिंदूर ऑपरेशन’ या देखाव्यांवर आधारित स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. गट अ घरघुती गणपती व गट ब सार्वजनिक गणपती या गटांमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे बक्षिसवितरण 25 सप्टेंबर रोजी एस.बी. हॉल वणी येथे करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार अशोक उईके, माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. 

गट अ घरघुती गणपतीत पद्मावती नगर येथील कु. ओंकार गंधेवार हिने प्रथम क्रमांक पटकावत 3,000 रुपयांचे नगद पारितोषिक पटकावले. लक्ष्मीनगर येथील कुमार यज्ञेश उमेश लिंगमे व कु. नम्रता राजू बोमावार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्यांना 2 हजार, 1,000 रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर आसावरी अशोक घुगे, रोशन शुगवाणी, रंजना राऊत आणि जोत्स्ना शिरभाते यांनी प्रोत्साहनपर प्रत्येकी 1,000 रुपये रोख बक्षिस मिळाले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप देऊ सन्मानित करण्यात आले.  

गट ब सार्वजनिक गणपती गटात गोकुळनगर येथील गोकुळ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. मंडळाला 5,000 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप देण्यात आले. गांधी चौक येथील शिंपी समाज सार्वजनिक गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावत 3,000 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप मिळवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला भाजप यवतमाळ माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राज्य परिषद सदस्य दिनकर पावडे, यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर, कुणाल चोरडिया, जिल्हा सचिव संतोष डंभारे यांच्यासह भाजप वणी विधानसभेतील नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन वणी विधानसभेच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली वणी शहर मंडळ अध्यक्ष अॅड. नीलेश माया महादेवराव चौधरी, उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, सचिव राजू गव्हाणे, सचिव वैशाली वातिले, महिला अध्यक्ष प्रिती बिडकर, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर व त्यांच्या टीमने केले. बक्षिसवितरणाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर मंडळ अध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी यांनी केले.

Comments are closed.