पुरुषोत्तम नवघरे, वणी: दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या फार्मासिस्ट दिनानिमित्त वणी-वरोरा मार्गावरील सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे योगदान अधोरेखित करण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
फार्मासिस्ट दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकतेचा दृढ संकल्प, समाजसेवेची जाणीव आणि एकतेची भावना वृद्धिंगत झाली. या कार्यक्रमातून केवळ फार्मासिस्टच्या कार्याचे कौतुकच झाले नाही, तर पुढील पिढीला फार्मसी व्यवसायाच्या मूल्यांचे पालन करण्यासाठी प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शपथेतून नैतिक, सुसंस्कृत व संवेदनशील आरोग्यसेवा व्यावसायिक घडविण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.
हा कार्यक्रम प्राचार्य सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष प्रदीप बोंगिरवार यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.


Comments are closed.