बहुगुणी डेस्क, वणी: धम्म प्रसारक व भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य बापूरावजी लोहकरे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते नागपूर येथे उपचार घेत होते. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौद्ध धर्मप्रसार, सामाजिक प्रबोधन व संघटन कार्यात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे बौद्ध समाजासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पत्नीचे निधन सुमारे 10 वर्षांपूर्वी झाले होते. बापूरावजी लोहकरे यांच्या निधनाने समाज एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.



Comments are closed.