युवतीच्या अश्लिल व्हिडीओ काढणा-याच्या आवळल्या मुसक्या

युवतीचा करायचा सारखा पाठलाग, तक्रारीनंतर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: युवतीच्या अंघोळ करतानाच व्हिडीओ काढणा-याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवार 20 जून रोजी वणी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडिता ही तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. आरोपी सतेंद्र सुखरी प्रसाद (25) रा. राजूर हा पीडितेला ओळखतो. तो नेहमीच पीडितेचा पाठलाग करीत असे. आणि तिचे व्हिडीओ काढत होता. परंतु भीतीपोटी पीडितेने ही बाब कुणालाही सांगितले नाही. परंतु गुरुवारी 20 जून रोजी सकाळी पीडिता ही अंघोळ करीत होती. त्यावेळी तिची नजर चुकवून आरोपी हा तिचा व्हिडीओ काढत होता. अचानक पीडितेचे लक्ष गेले त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. ही बाब पीडितेने तिच्या आईवडिलांना सांगितली. शेवटी त्यांनी याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 354 (सी), 354 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोहेकॉ अविनाश बनकर करीत आहे.

Comments are closed.