बॅटरी चोरट्यांना 12 तासात अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला चिखलात फसलेल्या कोळसा भरलेल्या ट्रकच्या बॅटरया लंपास करणाऱ्या चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केले. चोरट्यांकडून चोरी केलेली दोन्ही बॅटरी जप्त करण्यात आली आहे. संदीप मंगेश भोयर (30) व हेमंत बबन पायघन (40) रा. पूनवट असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

Podar School 2025

चढढा ट्रान्सपोर्ट कंपनी, चंद्रपूर तर्फे फिर्यादी बिरजू सहदेव खोब्रागडे यांनी गुरुवार 17 आगस्ट रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती की, त्यांच्या कंपनीचा ट्रक क्र. MH 31 CQ 3211 निलजई कोळसा खाणीतून कोळसा भरून वरोरा प्लांट करिता निघाला होता. दरम्यान वणी घुग्गुस मार्गावर नायगांव टी पॉइंट जवळ पावसामुळे ट्रक स्लीप झाल्याने ट्रक चालक संदीप सिंग याचा ट्रकवरून ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन चिखलात फसला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्रीच्या वेळी चालकाची तब्येत खराब झाल्याने तो ट्रक तिथच सोडून निघून गेला. सकाळी चढढा ट्रान्सपोर्ट कंपनीची टीम फसलेला ट्रक काढण्याकरिता पोहचली असता ट्रकच्या दोन्ही बॅटरी लंपास झाल्याचे आढळले. फिर्यादी सुपरवायजरच्या तक्रारवरुन ठाणेदार गजानन करेवाड व एलसीबी पथकाने वेगाने तपास चक्र फिरवून वरील दोन्ही आरोपीला चोरीच्या 2 बॅटरी किंमत 14 हजार रुपये सह अटक केली.

सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शिरपुरचे ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, सपोनि अतुल मोहनकर, हे.का. सुनील दुबे, योगेश डगवार, सुधीर पांडे, भोजराज करपते, नरेश राऊत, निलेश भुसे, विजय फुलके यांनी केली आहे.

Comments are closed.