बोटोनी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार, दहशतीचे वातावरण !
नागरिकांना सतर्क राहण्याचे वनविभागाकडून आवाहन
जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी परिसरातील कक्ष क्रमांक (69) मधील आवळगाव खैरगाव जंगलात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अस्वलाचा मुक्त संचार सुरु असून, येथील काही ग्रामस्थांना अस्वलाचे दर्शन झाले आहे. या संदर्भात वन विभागाचे वन रक्षकयांच्या कडून माहिती घेतली असता त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. त्या अनुशंगाने वनविभागातर्फे लोकांनी जंगलाकडे न जाण्याचे आवाहन केले आहे.
परिसरातील काही लोक मोहफुल, रानमेवा, जळवन ई गोळा करण्यासाठी जंगलाकडे जातात. काही ठिकाणी गावठी दारू काढण्याचे गोरख धंदे सुद्धा सुरु आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन असल्या कारणाने लोक घरातच आहेत. तरी पण शेतीच्या कामासाठी शेतकर्यांना शेतात जावे लागते. शेतीच्या परिसरास लागून वन शेत्र असून वन्य प्राण्याचा सध्या मुक्त संचार सुरु आहे.
सराठी खैरगाव रस्त्यावर अस्वलाचे दर्शन
सराठी खैरगाव रस्त्यावर अस्वलाचे दर्शन झाले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी व वनविभागाच्या कर्मचा-यांकडून सांगण्यात आले आहे. परिसरातील लोकांना सावध राहण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. वन विभागाने काढलेल्या जाहीर सूचनेचे पालन करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.