विवेक तोटेवार, वणी: उधार दिलेले पैसे मागितल्यावरून झालेल्या वादात दोन भावांनी बापलेकावर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी दोन्ही आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर येथील भगतसिंग चौकात शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, मो. सलीम मो. कादिर अली (22) हा राजूर कॉलरी वार्ड नंबर 4 येथील रहिवासी असून तो ठेकेदारीचे काम करतो. त्यांच्या वार्डातच आरोपी जमिल उर्फ मोल्लाभाई एनुलहक शेख (24) राहतो. काही दिवसांआधी सलीमचे वडील मो. कादिर अली मौलाला 2500 रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्यावर मौल्ला मो. कादीर यांना धमकी द्यायचा. दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास मो. सलीम हा भगतसिंग चौकातील पारावर बसून होता. दरम्यान तिथे मौल्ला व त्याचा भाऊ आसिफ उर्फ रिज्जू एनुलहक शेख कारने आला.
तेव्हा मो. सलीमने माझ्या वडिलांचे पैसे का देत नाही अशी विचारणा मौल्लाला केली. तेव्हा त्याने सलीमला मारहाण केली. सलीमने घरी जाऊन ही घटना त्याचे वडील मो. कादीर यांना सांगितली. तेव्हा त्याच्या वडिलांनी मौल्लाला कॉल करून त्यांच्या मुलाला मारहाण का केली अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी मो. कादीर यांना शिविगाळ केली. काही वेळाने दोघे बापलेक मोटार सायकलने ग्लासच्या दुकानात जात होते. तेव्हा त्यांना मौल्ला व रज्जू यांनी गाठले. त्यांनी शिवीगाळ करून डोक्यावर लोखंडी रॉड व कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. यात सलीमला गंभीर दुखापत झाली.
सलीम याच्या डोक्यावर आठ टाके पडले. सलीमने वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मौल्ला व रज्जू विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1), 115 (2) 352,351 (2) (3), 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. रज्जू व त्याच्या वडिलांनी देखील मो. सलीम व त्याचे वडील मो. कादीर यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. लिंकवर क्लिक करून वाचा परस्पर विरोधी तक्रार असलेली बातमी.
Comments are closed.