जुन्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

गणेशपूर रोडवरील घटना, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एका तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. गणेशपूर रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, स्वप्नील अरविंद चिंचोळकर (24) हा वासेकर ले आऊट वणी येथील रहिवासी आहे. याच परिसरात आरोपी नरेश दिगंबर पाते (40) राहतो. सोमवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास स्वप्निल हा गणेशपूर येथील निर्गुडा नदीजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तिथे आरोपी नरेश हा मित्रांसोबत होता. तिथे त्याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु होता.

दुस-या दिवशी मंगळवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास स्वप्निल हा गणेशपूर रोडवरून त्याच्या दुचाकीने जात होता. दरम्यान या रोडवर असलेल्या एका बारजवळ आरोपी नरेशने स्वप्निलला अडवले. त्याला काल नदीजवळ काय करीत होता, तू जास्त दादागिरी करतो काय असे म्हणत वाद घातला.

त्यानंतर नरेश घरात गेला. घरून त्याने एक लोखंडी रॉड आणला व रॉडने स्वप्निलला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत त्याच्या मांडीवर मार लागला. स्वप्निलने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. नरेश विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी नरेश दिगांबर पाते विरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला. ही मारहाण जुन्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे.

युवा शेतकरी, व्यावसायिक ते ऍग्रो टुरिझम… आशीषची अद्भुत यशोगाथा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.