घरी कुणी नसताना भाच्याची आत्यावर जबरदस्ती

भाचा व त्यांच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना भाच्याने आत्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी भाचा व त्याच्या मित्राविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

पीडित महिला (50) ही वणी तालुक्यातील रहिवासी आहे. ती गृहिणी आहे. घराच्या एका माळ्यावर पीडिता तिचे पती व मुलासह राहते तर दुस-या माळ्यावर तिचा भाऊ (65) त्यांच्या कुटुंबासह राहतो. या बहिणभावात प्रॉपर्टीचा वाद असून हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. घर खाली करण्यावरून पीडितेचा भाचा तिला नेहमी त्रास देतो. तसेच घर खाली करण्यासाठी धमकी देत असतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिनांक 21 जुलै रोजी रात्री पीडित महिलेचे पती व मुलं बाहेर गेले होते. त्यावेळी पीडिता एकटीच घरी होती. ही संधी साधून तिचा भाचा त्याच्या मित्रासह घरी आला. त्याने आत्याला घर खाली करण्यासाठी दम दिला. जर घर खाली केले नाही रेप करणार अशी धमकीही दिली. त्यानंतर भाच्याने आत्याचे कपडे फाडत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रतिकार केल्यामुळे तो तिथून निघून गेला.

त्यांतर चार दिवसांनी महिलेने या बाबत पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी भाचा व त्याच्या मित्राविरोधात बीएनएसच्या कलम 351 (2) 351 (3) 3 (5) 352, 74 व 76 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.