भगवा सप्ताहानिमित्त विविध राजकीय व सामाजिक उपक्रमाचे आयोजन

विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेची आगेकुच

निकेश जिलठे, वणी: शिवसेना (उबाठा) गटातर्फे सध्या वणी विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित विविध राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूजनाने या सप्ताहाला सुरुवात झाली.

भगवा सप्ताहा अंतर्गत वणी, मारेगाव व झरी तालुक्यात शाखा फलकाचे अनावरण, रुग्णसेवा, स्वच्छता अभियान, कार्यकर्ता संवाद असे विविध कार्यक्रम घेतले जात आहे. आज बुधवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. तर 8 ऑगस्ट रोजी वणी मधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तर संध्याकाळी शाखा फलक अनावरण व फलक नुतनीकरण हा कार्यक्रम होणार आहे.

रविवारी विधानसभा क्षेत्रातील पदाधिका-यांचा मेळावा
शुक्रवारी दिनांक 9 रोजी शेतकरी मंदिर येथे सकाळी 10 वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 10 रोजी दु. 11 वा. शीवतिर्थ येथे गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवारी दु. 12 वाजता तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांचा मेळाव्याने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिवसैनिक कामाला लागलेत – विश्वास नांदेकर
निवडणुकीला अवघ्या दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. नवखे शिवसैनिक उमेदवारी जाहीर करण्यासाठी धडपडत आहेत. तर शिवसैनिक सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. या सप्ताह दरम्यान नवीन शाखेची स्थापना, सदस्य नोंदणी इत्यादी कामे होणार असून गटप्रमुख, बुथप्रमुख, बीएलए यांच्यासाठी मेळावा देखील आयोजित कऱण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्त्वात विविध आंदोलने आणि उपक्रम राबवले जात आहे. त्यामुळे पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. गाव खेड्यातील शिवसैनिक पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. येत्या काही दिवसात लोकांच्या प्रश्नांवर आणखी आक्रमक आंदोलन व संघटनात्मक कार्य केले जाणार, अशी माहिती विश्वास नांदेकर यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Comments are closed.