रामपुरा येथील भैयाजी तोटेवार यांचे निधन

पत्रकार विवेक तोटेवार यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, वणी: रामपुरा येथील रहिवासी असलेले भैयाजी बापूराव तोटेवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून ते आजारी होते. जेवणाचा त्रास होत असल्याने ते केवळ हल्का आहार व ज्युस घेत होते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होता. मात्र आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते वणीतीलच पोस्ट ऑफिस कार्यालयातून पोस्ट मास्टर या पदावरून निवृत्त झाले होते. पत्रकार विवेक तोटेवार यांचे ते वडील आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा राहत्या घरून निघणार आहे.

Comments are closed.