सुशील ओझा, वणी: तालुक्यातील भेंडाळा येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी कोणत्याही सभा, व ग्रामसभा घेतल्या नसल्याच्या तसेच सर्व सभा कागदोपत्री असल्याच्या तक्रारी पंचायत समितीमध्ये केल्या होत्या. याच अनुषंगाने भेंडाळा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत समस्त गावकरी उपस्थित होते परंतु ग्रामसभेत सरपंच व उपसरपंच यांनी दांडी मारली. त्यामुळे गावकऱ्यात विविध शंका निर्माण झाल्या आहेत.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक विषयांवर चर्चा केली परंतु सरपंच व उपसरपंच हजर नसल्याने जनतेच्या तक्रारींचे निराकरण झाले नाही. ग्रामवासियानी गटविकास अधीकारी यांच्याकडे जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाची चौकशी करून लेखी अहवाल मागितला आहे. ग्रामसभा सहा गटविकास अधीकारी शिवाजी गवई व सचिव यांच्या उपस्थित घेण्यात आली.