वणीत एसटी कर्मचा-यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

टिळक चौकात कर्मचा-यांची जोरदार घोषणाबाजी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अद्यापही राज्य सरकार आणि एसटी कर्मचा-यांमध्ये असलेला संपाचा तिढा काही केल्या संपलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपामुळे पगाराविना आहे. त्यामुळे कर्मचा-यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांनी आज दिनांक 28 जानेवारीला भीक मांगो आंदोलन केले. दुपारी 2 वाजता वणी आगरातून या आंदोलनाला सुरूवात झाली. वणी आगरापासून सिंधी कॉलनी, टिळक चौक मार्गावरील दुकानात जाऊन आंदोलकांतर्फे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. टिळक चौक येथे आंदोलकांतर्फे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात 570 रुपये जमा झाले, तर काही चहा विक्रेत्यांनी चहा पाजल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आंदोलनात मिलिंद गायकवाड, अनंता कुलमेथे, ए. टी. आत्राम, नागनाथ कांबळे, प्रकाश नंदगिरीवार, प्रमोद गेडाम, दशरथ राजगडकर, दिलीप आत्राम, गणेश आत्राम, विशाल तोडसाम, वडस्कर गुरुजी, भालचंद्र मडावी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.