सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्राहकांना नाहक त्रास

कोरोना काळात गेट बाहेर ग्राहकांची रांग

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्राहकांना कोरोनाच्या नियमांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या नियमांमुळे व्यवहार करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या गेटसमोरच उभे राहावे लागते. त्यातच कोरोनाच्या धास्तीने गेट बंद करून ग्राहकांना गेटच्या बाहेरच उभे ठेवले जाते. व्यवहार करताना फक्त एकावेळी एकाच व्यक्तीला आतमध्ये घेतले जाते आणि तो बाहेर आला की दुसऱ्याला आतमध्ये पाठविले जाते. तर दुसरीकडे मात्र गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक उभे राहतात. त्यामुळे कोरोनाचे नियम केवळ बँकेच्या कर्मचा-यांच्या बचावासाठी असून ग्राहकांसाठी नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे. या बँकेत मोठ्या संख्येने शहरातील तसेच परिसरातील गावातील ग्राहक येतात. यात वयोवृद्ध ग्राहकांचाही समावेश आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहे.

Comments are closed.