मारेगावात जल्लोषात साजरा झाला भीम जयंती महोत्सव

चार दिवस शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.... मारेगाव वासीयांचा एकतेचा संदेश...

भास्कर राऊत, मारेगाव: जय भीम उत्सव समितीच्या वतीने भीम जयंती निमित्त मारेगाव येथे 11 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. या चार दिवसांमध्ये वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. 14 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताश्याच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मारेगाववासी रॅलीत सहभागी झाले होते.

Podar School 2025

जयंती महोत्सवाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आले. 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम येथील धम्मराजीका बुद्ध विहार येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते अभिषेक हेपट यांनी भगवान गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर प्रकाश टाकत जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

12 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता फुले शाहू आंबेडकरी गीतांचा बुलंद आवाज भीमेश भारती यांचा कव्वालीचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान प्रमुख वक्ते किशोर चहांदे यांनी “स्त्री मुक्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सायंकाळी 8 वाजता येथील शेतकरी सुविधाच्या हॉलमध्ये ऑर्केस्ट्रा स्वरधारा प्रस्तुत “हम भीम दिवाने” हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख गायक वासुदेव धाबेकर, मुकेश कुमार, निकिता गोवर्धन, नागेश रायपुरे व निवेदक साहिल दरने यांनी सादर केलेल्या बुद्ध भीम गीतांनी उपस्थिताना मंत्र मुग्ध केले. तर 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या पुतळ्याला अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 7 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताश्याच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

महामानवास अभिवादन करण्यासाठी संभाजी ब्रिगेड,कास्टट्राईब शिक्षक संघटना,ग्रामीण पत्रकार संघटना,यंग मुस्लिम कमेटी आदी सामाजिक संघटनेसह माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज भैया अहीर,आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष संजय देरकर सह आदी राजकिय नेत्यांनी हजेरी लावली.

मारेगाववासीयांचा एकतेचा संदेश
भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आले.यात 10 एप्रिल रोजी सायंकाळी येथील आंबेडकर चौकात राम नवमीच्या भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीतील राम भक्तांना शरबत व थंड पाण्याचे चे वाटप करण्यात आले. तसेच 14 एप्रिल रोजी येथील मस्जिद मध्ये रमजानचे रोजा असलेल्या मुस्लिम बांधवाना फळे वाटून इफ्तार पार्टी देण्यात आल्याने हम सब एक है या सामाजिक एकतेचा संदेश या सामाजिक उपक्रमा द्वारे देण्यात आला.

या कार्यक्रमाला एस.बी.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत नरांजे, नागेश रायपुरे, निलेश तेलंग, आकाश भेले, सुमित्र वनकर, गौरव चिकाटे, सुदर्शन पाटील, प्रफुल्ल भगत, ओमप्रकाश पाटील, मोरेश्वर खैरे, बबन बन्सी पाटील, रेखाताई काटकर, सुवर्णा नरांजे, कांचन धोपटे, नूतन तेलंग, मीना दीगाडे, अश्विनी खाडे, सपना वनकर, पूजा तेलंग, सुनीता चिकाटे यांच्यासह भीम जयंती उत्सव समितीच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

Comments are closed.