वादळीवा-याचा केळी पिकाला तडाखा, भाजीपाल्याचेही नुकसान

प्रयोगशील शेतक-याच्या पहिल्यांदाच केळीचे पिक घेण्याच्या प्रयत्नावर निसर्गाने फेरले पाणी...

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री तालुक्यात आलेल्या वादळी वा-याने परिसतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाला सुद्धा जमीनदोस्त झाला. तर चोपनमधील उदयोनमुख शेतकऱ्याने पहिल्यांदाच प्रयोग करून लागवड केलेली केलीसुद्धा याच वाऱ्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

दि. 13 एप्रिलला बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. आधी साधारण वाटणाऱ्या या वाऱ्याने पुढे रौद्ररूप धारण केले. या वादळामुळे मार्डी-वडकी रोडवरील अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब पडले व तारा देखील तुटल्या. चोपण येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याची झाली. येथील युवा शेतकरी नितीन लक्ष्मण चिव्हाणे यांचे केळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चिव्हाणे यांनी एक एकरामध्ये केळीची लागवड केली होती. वर्धा येथील नर्सरीमधून केळीचे 1500 झाड आणून लावले. 6/6 /2021 मध्ये या केळीची शेतामध्ये लागवड केली होती. 5*5 अंतरावर लावलेली ही केळी चांगलीच बहरलेली होती. शेतकऱ्याने त्यासाठी खर्चही मोठया प्रमाणावर केलेला होता. आता यापासून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल या आशेत असलेल्या शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फेरले गेले.

वादळाचा तडाखा बसलेली केळीची बाग

13 एप्रिलला आलेल्या वादळवाऱ्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. नव्यानेच प्रयोग करायला गेलेल्या शेतकऱ्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. याच परिसरात अनेकांनी भाजीपाल्याचेही पिक घेतले आहे. वादळी वा-याने भाजीपाला देखील जमिनदोस्त केला आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहेत.

हे देखील वाचा:

मारेगावात जल्लोषात साजरा झाला भीम जयंती महोत्सव

Comments are closed.