पिंपळगाव, उकणीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

0

वणी: तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवून सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवानंद वानखेड़े, तर प्रमुख पाहुने म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वणी तालुका अध्यक्ष आकाश सुर होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खवसे यांनी केले, आभार अशोक वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सूरज कांबळे, प्रफुल वानखेड़े, विठ्ठल आवारी, शांताराम वाघमारे, स्वप्निल कांबळे, मंगल आवारी यांनी परिश्रम घेतले.

उकणी येथे भीमजयंती उत्सहात साजरी

तालुक्यातील उकणी येथे संध्याकाळी भीमजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नथ्थूजी पा. खाडे (पोलीस पाटील) उकणी, तर प्रमुख पाहुने म्हणून उत्तम पाचभाई (कोतवाल) उकणी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवाजी पा. नगराळे होते.

गावात एका 20 वर्षांच्या अपंग मुलाचा आणि एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्यात आला होता. सर्वप्रथम या दोघांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्यकार्यक्रमाला सुरूवात झाली. तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आलं. दौलत पाटिल सातपुते यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेऊन, पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर भाऊ डांगे तर आभार प्रदर्शन दिलीप भाऊ दुर्योदन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप कांबळे, नयन सातपुते, निखिल सातपुते, जगदीश डांगे, नथ्थू डांगे व गावक-यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.