बोटोणीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी
जयप्रकाश वनकर, बोटोणी: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वि जयंती बोटोनी येथे बौद्ध विहार परिसरात साजरी करण्यात आली. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रमामध्ये निमंत्रीत वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर गायनाच्या कार्यक्रमातून गावक-यांचे प्रबोधन आणि मनोरंजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक बौद्ध कमेटी द्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक मंजुषा मडावी ह्या होत्या. त्याच बरोबर पं. स. सदस्य सुनिता लालसरे, पोलीस पाटील मुकुंदराव बदखल शंकर लालसरे, बाबूलाल सिडाम, ग्रा.प. सचिव आशा वटे यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज साठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित गेडाम, सचिन बक्शे, आशिष वनकर, अक्षय दोडेवर, विलास भासारकर, प्रवीण वनकर आणि बौद्ध कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.