मारेगाव येथील भृजंग वरारकर यांचे निधन

यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू

0

नागेश रायपुरे, मारेगाव: वणी येथील रहिवाशी व मारेगाव शहरातील कृषी संपदा या कृषी केंद्राचे संचालक भुजंग वरारकर यांचे अल्पशा आजाराने यवतमाळ येथे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. दोन आठवड्याआधी त्यांची तब्येत बरी नव्हती. मात्र त्यांना कोरोनाचे लक्षणं जाणवत असल्याने ते यवतमाळ येथे उपचारासाठी गेले होते. तिथे ते कोरोना पॉजिजिव्ह आले होते.

यवतमाळ येथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शोककळा पसरली.

कृषी केंद्र संचालकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
भुजंग वरारकर यांची मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून ओळख होती. परिसरात त्यांना ‘मामा’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील आंबेडकर चौकात त्यांचे कृषी संपदा नावाने कृषी केंद्र होते. दरम्यान शहरातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी आपले व्यावसायिक प्रतिष्ठाण बंद ठेऊन  त्यांच्याप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्यात. भुजंग वरारकर यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.