झरी पंचायत समितीमध्ये डेमोहाऊसचे भूमीपूजन

0

सुशील ओझा, झरी: गुरुवारी दिनांक 10 जून रोजी पंचायत समिती झरीजामणीच्या प्रांगणात डेमो हाऊसचे भूमीपूजन करण्यात आले. झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या शुभहस्ते सदर डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नेमक घरकुल कसे बाधंकाम करावे ह्या बद्दल लोकांना डेमो देण्यात आला. सदर डेमो हाऊसची एकूण किंमत 2 लाख 78 हजार रूपये आहे.

ह्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्या संगीता मानकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, विस्तार अधिकारी पंचायत एस. जे. इसलकर, पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी सुधाकर जाधव, शा. अ. वलथरे, स.ले. अ.नगराळे, विष्णु निकोडे, माकोडे, कांगणे, महेश मांडवकर, गेडाम, दर्शन पाटील, संतोष मेंढे व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

Leave A Reply

Your email address will not be published.