मारेगाव तालुक्यातील द्विशिक्षकी शाळांचा भार एकाच शिक्षकावर

प्रतिनियुक्तीवर दिलेल्या शिक्षकाला हेलपाटे

0

वणी: उपविभागातील मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणा-या द्विशिक्षकी शाळांमधील गौराळा,गाडेगाव, दांडगाव या सारख्या कित्येक शाळांवर एकच शिक्षक अध्यापन करीत आहे. हे. मुख्याध्यापकाचा प्रभार आलेल्या पुढा-यांची खातरजमा, पालकांच्या तक्रारी या सर्व बाबीला तोंड देवून सदर शिक्षकांना विद्यार्थ्यांना कसंबसं शिकवावं लागत आहे. कार्यालयीन कामं असलं की शिक्षकांना दुपार नंतर शाळा सोडून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.

शाळेची पहिली घंटा वाजली की प्रार्थना, त्यानंतर विद्यार्थ्यांची हजेरी, जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांना षिकविण्याची व कार्यालयीन कामे सांभाळण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर असल्याचं कित्येक शाळांमध्ये दिसून आले आहे. महिला शिक्षक असलेल्या शाळांमध्ये तर शिक्षिकेला चांगलाच त्रास सहन करावा लागतोय. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, गावपुढा-यांकडे बघावं की शासकीय अभियानाचं काम करावं अशा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. अनेक कामाचा बोजा एकाच शिक्षकावर आल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणीक नुकसान होत आहे.

दांडगाव काही गावातील पालकांनी पंचायत समितीकडे शिक्षकाची मागणी केली आहे. मात्र पंचायत समिती शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिका-यांनी शिक्षक उपलब्ध नसल्याचं कारण दाखवून त्यांना आल्यापावली परत पाठविलं, अशी माहिती पालकांनी दिली आहे. एकीकडे शहराजवळील मोठ्या शाळेवर दोन दोन शिक्षकांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील टोकाच्या गावातील शाळेचा कारभार एकाच शिक्षकावर टाकण्याचा प्रकार पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं केला आहे.

(हे पण वाचा: दांडगाव शाळेत शिक्षिकेच्या पुढाकारानं वृक्षारोपण)

मर्जीतील शिक्षकांना जवळची गावं मिळवण्याच्या हेतूतूनच शिक्षण विभाग हा प्रकार करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.