बहुगणी डेस्क, वणी: आपलं घरं म्हणजे सर्वात सुरक्षित जागा. असा आपला समज असतो. बरेचदा तो खराच असतो. मात्र कधी कधी अत्यंत सुरक्षित असलेल्या आपल्याच घरातून काहीतरी अनपेक्षित घडतं. बराच काळ आपण त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. नेमकं हेच विराणी टॉकीज परिसरातील गुरुनगरात घडलं. मुळात नवीन वाघदरा येथील ठेकेदार सफिक सहेमद कासीम अली (39) वणीतील गुरुनगरात राहतात.
शुक्रवार दिनांक 21 मार्चला त्यांनी आपली गाडी घरी पार्क केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 22 मार्चला सकाळी 6.00च्या दरम्यान त्यांना आपली MH 29 BR 8617 क्रमांकाची प्लॅटिना बाईक जागेवर दिसली नाही. त्यांना काळ शोधाशोध केली. आजूबाजूला चौकशी केली. मात्र, हाती काहीच आलं नाही. तेव्हा आपली बाईक चोरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अखेर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जबानी रोपोर्टवरून गुन्हा नोंद करून पुढील तपास हेड कॉंस्टेबल सीमा राठोड करत आहेत.
Comments are closed.