बोटोनी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

बिरसा मुंडा हे आदिवासी समुदयासाठी प्रेरणास्थान आहे: सुमित गेडाम

0

जयप्रकाश वनकर, बोटोणी: क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 142 वी जयंती बोटोणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर सीडाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ देवगडकर, विठ्ठल सिडाम हे होते.

क्रांतीसूर्य बिरसमंडा यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटी विरुद्ध आदिवासी दलित समुदायातील लोकांचे धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासासाठी मोठा लढा दिला होता . बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली  झारखंड येथील रांची येथे झाला होता. बिरसा मुंडा हे आदिवासी समुदयासाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे असे मत सुमित गेडाम यांनी आपल्या विचारातून मांडले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमित गेडाम यांनी केले तर आभार सचिन बक्षे यांनी मानले. कार्यक्रमास वामन तोडसाम, चंदा गेडाम, निर्मला परचाके, रोहित गेडाम  सुहास तोडसाम, अंजना बाई गेडाम आदिंनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.