भाजप लागली कामाला! वणी शहरासाठी प्रभाग प्रभारी व सहप्रभारी नियुक्त
प्रभारी राहणार पक्ष आणि जनतेतील मजबूत दुवा – अॅड. नीलेश चौधरी
बहुगुणी डेस्क, वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. पक्षाने शहरातील प्रत्येक प्रभागात संघटन बळकट करण्यासाठी ‘प्रभाग प्रभारी’ व ‘प्रभाग सहप्रभारी’ यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
या नियुक्त्यांमागील उद्देश म्हणजे प्रत्येक प्रभागातील मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित करणे, नागरिकांपर्यंत पक्षाने आतापर्यंत केलेली विकासकामे तसेच आगामी योजनांची माहिती पोहोचविणे आणि संभाव्य उमेदवारांविषयी मतदारांचा कल जाणून घेणे हा आहे. शहराध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रभारी ठरणार दुवा – अॅड. नीलेश चौधरी
भाजपचे बळ म्हणजे आपले कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास. आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रत्येक प्रभागात घराघरात पोहोचून विकासाची ग्वाही देणे हेच आमचे ध्येय आहे. प्रभाग प्रभारी आणि सहप्रभारी हे पक्ष आणि जनतेमधील जिव्हाळ्याचा दुवा ठरतील.
कोण आहेत प्रभारी?




Comments are closed.