व्योम विरुटकरचा विक्रमी पराक्रम! ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद
अवघ्या 5 वर्षांच्या व्योमने 61 गाड्यांची नावे सांगून रचला विक्रम
भूषण कुमार, वणी: वणी येथील आवरी लेआउटमधील यूकेजी वर्गात शिकणाऱ्या व्योम निलेश विरुटकर या 5 वर्षे 9 महिन्यांच्या चिमुकल्याने थक्क करणारी कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये आपले नाव नोंदवले आहे.
व्योमने अवघ्या 2 मिनिटे 33 सेकंदांत 61 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कार्सची छायाचित्रे पाहून त्यांच्या कंपनीची नावे अचूकपणे सांगितली. या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्याला “IBR Achiever” ही मानाची उपाधी प्रदान करण्यात आली आहे. हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने 9 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृतपणे मान्य केला. व्योम आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना देतो.



Comments are closed.