भाजपचा मोमिनपु-यात माहौल, शेकडो तरुणांचा पक्ष प्रवेश

प्रभाग 10 च्या प्रचारादरम्यान स्थानिक तरुणांचे बोदकुरवार यांना सरप्राईज

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात भाजपचा प्रचार जोरात सुरू असून शनिवारी रात्री मोमिनपुरा परिसरात शेकडो तरुणांनी पक्ष प्रवेश करून वातावरण भारावून टाकले. या प्रवेशामुळे भाजपला प्रभागात मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे. भाजप उमेदवार आरती वांढरे, अनिल चिंडालिया आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचार दौऱ्यात स्थानिक तरुणांनी अचानक पक्ष प्रवेश करून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना सरप्राईज दिले. या क्षणी सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ-संध्याकाळ अशा दोन शिफ्टमध्ये भाजपचा प्रचार सुरू आहे. धुंवाधार प्रचारामुळे हवा आता लाटेत रूपांतरित होत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भाजपने प्रभाग 10 मध्ये प्रचार दौरा घेतला. यात मोमिनपुरा येथील दौ-यात मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची कॉर्नर सभा झाली. या सभेत तरुणांनी विकासाला प्राधान्य देत मोमिनपुरा येथे झालेल्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले.

जात-धर्मापलीकडे सर्वांसाठी विकासकामे
विकास हीच आमची ओळख आहे. जात, धर्म, वर्ग यापलीकडे जाऊन आम्ही सर्वांसाठी काम केले आहे. माझ्या कार्यकाळात विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. शहरातील मुलभूत समस्या सोडवण्यावर मी नेहमीच भर दिला. मोमिनपुरा हा भाग नेहमी आमच्या सोबत राहिला आहे आणि यावेळीही तरुणांनी दाखवलेली साथ आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. पदावर नसतानाही मी मुख्यमंत्री यांच्याशी सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा करत असतो. मोमिनपुरातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो. तरुणांनी दाखवलेला विश्वास ही आमच्या कार्याची खरी पावती आहे. – मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कॉर्नर सभेच्या आधी मोमिनपुरा येथील रहिवाशांनी मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे प्रभाग 10 व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व उपस्थित मान्यवरांचे बुके देऊन स्वागत केले. प्रभागाच्या प्रचार रॅलीत भाजपचे वणी शहराध्यक्ष ॲड निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.