अडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
दिग्गज फेल तर कार्यकत्यांनी मारली बाजी
सुशील ओझा, झरी: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 15 जानेवारीला जाहीर झाले. त्यात दिगग्ज नेते व पुढाऱ्यांना मोठा दणका बसला असून ग्रामपंचायत वर सत्ता काबीज करून ठेवण्यात यश प्राप्त झाले नाही. तर अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या बळावर यश मिळवले.
तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या अडेगाव सारख्या मोट्या गावात भाजपचे संजय दातारकर माजी सरपंच अरुण हिवरकर, मंगेश पाचभाई, भास्कर सूर यांच्या नेतृत्वात पॅनल लढविण्यात आले. ११ पैकी ८ सदस्य निवडून आणून सत्ता काबीज केली. निवडणुकीत अरुण हिवरकर, संजय आत्राम, गंगा आत्राम, वंदना पेटकर, संतोष पारखी, भास्कर सूर, माया हिवरकर, सीमा लालसरे निवडून आले.
अर्धवन येथे प्रा श्याम बोदकुरवार व शंतनु बोदकुरवार यांच्या नेतृवात पाच उमेदवार निवडून आले त्यात सविता कप्पलवार,सोनेराव टेकाम,नवनीतरेड्डी चिंतलवार,गजानन गोदेवार व प्रिया केराम निवडून आले. कमळवेल्ली येथे काँगेसचा दारू पराभव करण्यात आला असून वामन एलचेलवार व मोहन चुक्कलवार यांच्या नेतृत्वात सात पैकी ६ उमेदवार आणून ग्रामपंचायत ताब्यात केली आहे बेबी वेट्टी,जयश्री चुक्कलवार,पुष्पा चुक्कलवार, वामन हलवले,गणेश नुगुरवार,कीर्ती कोलावार व शिवाजी कुडमेथे निवडून आले.
धानोरा येथे शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संतोष माहुरे यांच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात ओढून आणण्यात यश आले आहे. येथील गजानन काळे, ईश्वरी राजगडकर, शाहिना शेख शब्बीर, मनीषा भोयर, रमेश दोरशेट्टीवार, लक्ष्मी मंचलवार, भूमन्ना म्याकलवार यांनी विजय मिळवला.
सुरदापुर येथील विलास संसनवार, रामरेड्डी गुम्मडवार, संजीवरेड्डी बद्दमवार, उषाताई सामावार व शेख रुकसाना शेख गुलाम निवडून आले. येडसी येथील विनोद धोटे,बेबी नाकले, दादाजी चापडे, भोळा नगदाळे, सीमा गेडाम व सुनीता गवळी निवडून आले.
तसेच हिरापुर ७,पांढरकवडा लहान ४, खडकडोह ४, बोपापुर ६, दरा ७, दाभाडी ४, कोसारा ६, मुळगव्हान ७, पांढरवानी ७, निंबादेवी ७, मार्की ७, सिंधिवाढोना ४ व खडकी येथे ७ सदस्य निवडणून आणण्यात यश आले. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांच्या मार्गदर्शनात लढवण्यात आली होती.
हे देखील वाचा: