केशव नागरी पतसंस्थेत रक्तदान शिबिर पार

102 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

पुरुषोत्तम नवघरे, वणीः वणी येथील सुपरिचित अशा केशव नागरी सहकारी पतसंस्थेत 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली. या शिबीराचे उदघाटन केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर के. खोंड, संस्थेचे उपाध्यक्ष दौलत वा वाघमारे, संस्थेचे मा. सचिव अनिल म. आक्केवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबीरात वणी शहरातील व तालुक्यातील अनेक युवकांनी व लोकांनी सहभाग नोंदविला या रक्तदान शिबीरात एकुण 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यात प्रामुख्याने संस्थेचे संचालक गजानन अघळते यांनी सहकुटुंब रक्तदान केले. शिबिरात महीलांचा विशेष सहभाग होता. डॉ हेडगेवार रक्तपेढी, नागपूर येथील चमुनी रक्त संकलन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मा. जिल्हा परीषद सदस्य विजय पिदूरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, विशाल दुधबळे, विशाल काळे, यांनी शिबिराला भेट देत रक्तदारांना प्रोत्साहित केले. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी केले. तर संस्थेचे मा. सचिव अनिल म. आक्केवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या शिबीराच्या यशस्वीते साठी सतिश कुल्दीवार, अरूण कावडकर, किशनलाल खुंगर, प्रदीप राशतवार, संचालिका कल्पना गुंडावार, तज्ञ संचालक विनय कोंडावार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार, शाखा व्यवस्थापक रविंद्र ठेंगणे, विभागीय विशेष अधिकारी कवडु पिंपळकार, प्रदीप कामडे, मुकेश गुप्ता, विकास चौधरी, संजय लोणारे व इतर सर्व कर्मचारी तसेच संस्थेच्या पांढरकवडा शाखेचे संचालक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.