निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये दिनांक 30 मार्च रोजी सोमवारी स्थानिक एसपीएम शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती वणी, पोलीस पाटील संघटना, निस्वार्थ सेवा 24 तास या संघटनेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून केवळ नोंदणी कणा-यांनाच रक्तदान करता येणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रभाव असल्याने प्रशासनाने सार्वजनिक उत्सव रद्द करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे यावर्षी दरवर्षी सार्वजनिक स्वरुपात साजरा होणारा श्रीरामनवमी हा उत्सव व त्यानिमित्त निघणारी शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीरामनवमी उत्सव समितीने घेतला. सध्या प्रशासनाने आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी काही सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिर घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार यावर्षी श्रीरामनवमी उत्सव समितीने हा उत्सव रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रक्तदात्यांना मोबाईलवर करण्यात येणार संपर्क: रवि बेलूरकर
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यंत शिस्त आणि नियोजनबद्धरित्या या शिबिराचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. आम्हाला इथे गर्दी अपेक्षीत नाही. त्यामुळे रक्तदात्यांना आम्ही फोनवर संपर्क साधणार आहोत. एसपीएम शाळेतील सात ते आठ हॉल या कार्यासाठी निवडण्यात आले आहे. प्रत्येक हॉलमध्ये फक्त पाच बेड लावण्यात येईल. शिवाय जो पर्यंत त्या रक्तदात्यांचं रक्तदान होत नाही, तो पर्यंत इतर रक्तदात्यांना संपर्क साधला जाणार नाही. त्यासाठी 10 लोकांची टीम आम्ही तयार केली आहे. शिबिराच्या ठिकाणी मेडिकल स्टाफ आणि आयोजन समितीचे केवळ एक जण हजर राहणार आहे. – रवि बेलूरकर, श्रीराम नवमी उत्सव समिती
या शिबिराला केवळ नोंदणी केलेल्या रक्तदात्यांनाच रक्तदान करता येणार आहे. सोमवारी ठरलेल्या वेळी जितक्या लोकांचे रक्तदान होऊ शकते त्यांचेच रक्तदान होणार आहे. उर्वरीत रक्तदात्यांना पुढच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आधी नोंदणी करावी. तसेच शिबिराच्या ठिकाणी संपर्क केल्याशिवाय कुणीही येऊ नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क
रवि बेलुरकर 9823894757, नितीन शिरभाते 09623086646, कुंतलेश्वर तुरविले – 9921025926, संतोष डंभारे – 9881487327, राकेश लक्ष्मण बुग्गेवार 7972884347, 9850277096, राजेंद्र सिडाम – 9850008924, गणेश धानोरकर – 9421775450,
आशीष डंभारे – 9665828291, कौशिक खेरा – 9156068623, पंकज कासावर – 8275300019, निलेश डवरे – 9011870397
प्रणव पिंपळे – 7709801512, अमोल धनोरकर – 8007393770, विशाल ठोंबरे – 9657980441, रवि रेभे – 9822367891
पवन खंडाळकर – 7721800616, रोहन शिरभाते – 9623086166, अवी आवारी – +91 73500 32507, शिवम सिंह – 9373182621, कुणाल मुत्त्यालवार – 7020653268, पियुश शतपलकर – 9049799788, प्रसन्न संदलवार – 8483895159
नितेश मदिकुंटावार – 9011882923, आकाश बुद्देवार – 7721879107, आतीष कटारिया – 5788590650
कम्लेश त्रिवेदी – 9284652297, पारितोष पानट – 7875058681, मयुर मेहता – 9067543288, विशाल दूधबड़े – 9673751678
आशीष ठाकुर – 8888488547