सरोदी समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर

जवळपास 70 लोकांनी केले रक्तदान

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे समाज एकत्रीकरण म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता लाईफ लाईन ब्लड बँक यांना बोलाविण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम मोरे, उपाध्यक्ष सुभाष वाघडकर, सचिव अंकुश मफुर, विदर्भ संघटक पांडुरंग गदाई, जिल्हाध्यक्ष संतोष गदाई, जिल्हाउपाध्यक्ष विजय ऐकणार, आदीलाबाद जिल्हाध्यक्ष सुनील मंडाळे यावेळी सरोदी समाज संघटना शाखाध्यक्ष शंकर घोगरे,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपाध्यक्ष सुरेश वाईकर, सचिव दीपक मोरे, देवस्थान समितीचे सदस्य मोहन वाईकर, नागोराव आतमंगल, किशोर भगाडे, विलास वाघडकर, विकास वाईकर, विजू गवते, दीपक राठोड, संदीप मंडाले विदर्भातील गावपातळीवरील शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments are closed.