बोअरचे पाईप नेणाऱ्या गाडीचा अपघात, एक जण जागीच ठार

मेंढोली गावाजवळची घटना

विवेक तोटेवार, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली गावाजवळ बोअरवेल मशीनचा सहाय्यक ट्रक पलटी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. रविवार 29 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. रामेन अमृतलाल पुसाम (20) रा. जिल्हा बालाघाट, मध्यप्रदेश असे मृत युवकाचे नाव आहे. धावत्या ट्रकचा समोरील टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

माहितीनुसार वणी येथील सय्यद सरफराज यांच्या मालकीचा बोअरवेलचे पाईप वाहून नेणारा ट्रक क्रमांक (MH29T0579) पाईप घेऊन शिरपूर कडून मेंढोलीकडे जात होता. दरम्यान मेंढोली गावाजवळ धावत्या गाडीचा समोरचा टायर फुटला. यात चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला खाईमध्ये पलटी झाला. या घटनेत मशीनवर काम करणाऱ्या रामेन पुसाम या मजुराचा दबून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली दबलेल्या मजुराचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकविरुद्द कलम 184, 304 (अ) 337, 338 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!