पक्षाशी गद्दारी करणारा पदाधिकारी व सहका-यांवर कारवाई होणार – बोदकुरवार

पत्रकार परिषदेत संजीवरेड्डी बोदकुरवार यांची स्पष्टोक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: माझ्या दो टर्मच्या कालावधीत कालावधीत केवळ जनहिताचे काम केलेत. मतदारसंघात विकासाचे मॉडेल तयार केले. अनेक विकास कामे अद्यापही बाकी होते. ही निवडणूक म्हणजे उर्वरीत कामे करण्याची व नागरिकांच्या सेवेसाठी दिलेला शब्द पाळण्याची एक संधी होती. निवडणुकीत अपयश आले असले तरी मतदारांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला पुढील प्रवासासाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे पराभव झाला असला तरी जनहितासाठी कायम तत्पर राहणार, असे वचन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले. निवडणुकीतील पराभवानंतर बोदकुरवार त्यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पक्षविरोधी काम केलेले भाजपचे पदाधिकारी व सहका-यांविरोधात कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले की पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सज्ज आहे. निवडणुकीत महायुतीचे नेते, कार्यकर्त्यांनी शर्थीन प्रयत्न केल्याने तब्बल ८० हजार मतदारांनी मला मतदान केले आहे. त्यांच्या मतांचे ओझे माझ्यावर आहे. अनेक समाज घटकांनी माझ्यासाठी मेहनत घेतली. तालुक्याच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला असून, ती विकासकामे करून घेण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांवर राहणार आहे. त्यासाठी माझाही पाठपुरावा राहील. राज्यात व देशात महायुतीचे सरकार असल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने काम करणार. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोमाने काम करून पक्षाला मोठे यश मिळवून देणार व पराभवाची परतफेड करणार असे ही ते म्हणाले. 

 

पक्षाशी गद्दारी करणा-यांवर होणार कारवाई – बोदकुरवार
पत्रकार परिषदतेत त्यांनी आपल्या पराभवाचा ठपका माजी नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व त्यांच्या सहका-यांवर ठेवला. युवा मोर्चाचा एक पदाधिकारी व तीन ते चार नगरसेवकांनी आपल्यासमोर विरोधकांचा प्रचार केल्याचा आरोप केला. तसेच एका नगरसेवकाच्या पतीने देखील विरोधात काम केले. त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याचेही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मागील दोन टर्म आमदार राहिल्याने विधानसभेच्या कामाचा चांगला अनुभव आहे. तालुक्यातील आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीला महायुतीच्या कार्यकर्त्यांना म्हणून सामोरे जायचे आहे. दहा वर्षात प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन मतदारसंघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गरजूंना व अडचणीत असलेल्या लोकांना वैयक्तिक मदतही केली; पण त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. निवडणुकीत यापुढे कायम जनतेच्या सेवेसाठी मी व माझे कार्यालय सदैव उघडे असून, जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत राहणार असल्याचे माजी आमदार बोदकुरवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिनकर पावडे, विजय पिदूरकर, रवि बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते व नितीन वासेकर उपस्थित होते. संचालन रवी बेलुरकर यांनी केले.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.