विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगर समोर मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी स. 10.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. हा परिसर झाडाझुडपांचा असून या मार्गावर स्वर्णलीला शाळा आहे. मृत इसमाचे वय हे 30 ते 35 वर्षे असावे असा अंदाज बांधला जात आहे. या वर्णनाचे कुणी इसम बेपत्ता असल्यास वणी पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रकरणी कलम 194 बीएनएसएस अन्वये मर्ग वणी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.