विवेक तोटेवार, वणी: वणीतील तैली फैल परिसरात शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घराच्या खोलीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे 60 वर्ष आहे. तेली फैल येथे वैभव यशवंत निमकर यांचे घर आहे. त्यांच्या घरी विजय रायमल्लु गुर्जला राहतो. विजयच्या घरी तीन ते चार दिवसांआधी मृत अनोळखी इसम राहण्यासाठी आला होता. तो विजयला घरगुती कामासाठी मदत करीत होता. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता विजय हा हालचाल करीत नसल्याचे विजयला आढळून आले. विजयेन याची माहिती घरमालक वैभव याला दिली. वैभवने याची माहिती पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर इसमाला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.