वणी: वणीतील स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये 29 जुलैला ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही ग्रंथ प्रदर्शनी शहरातील शिक्षक व विद्यार्थ्यासाठी सोमवार दि.31 जुलै व मंगळवारी दि.1 ऑगस्टला सर्वांसाठी खुली राहणार. या प्रदर्शनीचे उदघाटन शिक्षण सभापती स्वाती खरवडे यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समितीचे प्रा.महादेव खाडे, धनराज भोंगळे, नितीन चहानकर, माजी उपाध्यक्ष किशन खुंगर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहसीना खान, मुख्याध्यापक गजानन कासावार उपस्थित होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन स्वाती खरवडे यांनी केले. या ग्रंथ प्रदर्शनात नवीन खरेदी केलेल्या भारत भारती प्रकाशन च्या पुस्तकासोबत शिक्षकासाठीच्या पुस्तकांचा सुद्धा यात समावेश होता. या प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त करून प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी.अशी अपेक्षा शिक्षण सभापतींनी व्यक्त केली.
(धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार व शेती मार्गदर्शन शिबिर)
या ग्रंथ प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गजानन कासावार, मीना काशिकर, रजनी पोयाम, प्रेमदास डंभारे,अविनाश तुंबडे, गीतांजली कोंगरे, दर्शना राजगडे इत्यादींनी परिश्रम घेतले.