सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ सदस्यांचा मेळावा

कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुर्दापूर येथे बुधवारी दिनांक 17 जुलै रोजी सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाटण-माथार्जून सर्कल येथील गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे प्रमुख मार्गदर्शक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगजी गोहाकार होते.

Podar School 2025

यावेळी पाटण-माथार्जून सर्कलमधील संपूर्ण बुथविषयी माहिती घेऊन कमिटी कशी तयार करणे, बुथ बांधणी केवळ निवडणुकीपरती मर्यादीत न बनवता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेवटच्या व्यक्तीची समस्येची दखल घेऊन त्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून समस्या कशा सोडवाव्यात. बुथ प्रमुख व कमिटीची यंत्रणा कशी राबवावी याविषयी डॉ. महेंद्र लोढा यांनी मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकार मार्गदर्शन करताना म्हणाले की कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविल्या पाहिजे. गावातील प्रत्येक बुथ प्रमुख आणि सदस्यांनी जनसंपर्क वाढवून मतदारांशी अधिकाधिक संवाद साधणे आवश्यक आहे.

यावेळी प्रभाकर मानकर, संदीप धवणे, नितीन गोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मापूर यांनी केले तर आभार गजानन लाकशेट्टीवर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाटण-माथार्जून सर्कलमधील बुथ प्रमुख व कमिटी सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.