वणी येथे बहुजन समाज पार्टीची कार्यकारणी गठीत

विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण खानझोडे यांची निवड

0

बहुगुणी डेस्क, वणी: बहुजन समाज पार्टीतर्फे वणीत गुरुवारी दिनांक 22 जुलै रोजी स्थानिक धनोजे कुणबी मंगल कार्यालयात समिक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वणी विधानसभेसाठी कार्यकारिणी गठित करण्यात आली. वणी विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी प्रवीण खानझोडे यांची निवड करण्यात आली. तसेच सर्व समिती सदस्यांची नेमणूक करण्यात आले. जिल्हा पातळीवरून थेट विधानसभा पातळीवर पदभार घेतल्याने याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवीण खानझोडे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चाही या अनुशंगाने रंगू लागली आहे.

Podar School 2025

वणी विधानसभा क्षेत्रातर्फे पक्षाचे प्रदेश सचिव पंडित दीघाडे, नाना देवगडे, जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या संघटन बैठकीत वणी विधानसभा क्षेत्राची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अशी माहिती बसपा तर्फे देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ह्या बैठकीला सेक्टर प्रभारी व अध्यक्ष उपस्थित होते, तसेच विजय वानखेडे, मनोज जीवने, प्रल्हाद कोठार, माधव बुरडकर, जयप्रकाश वनकर, संतोष नगराळे, सुरेंद्र पुडके, अनिल भोंगाडे, अविनाश सातपुते, दीपक ब्राह्मणे, किसन कोरडे, पंकज कांबळे, आकाश लभाने, प्रफुल शेंडे, राजू ठमके, भगवान मजगवली, देवानंद वानखडे, वसंता मेंढे, सोमेश्वर जांगडे, मुकेश दिवे, संतोष वानखेडे, उत्तर भारतीय अभय राम, गुलाब राम, राकेश वाघमारे, विकेस चुणारकर महिलामध्ये प्रिया पुडके, रंजना चंदनखेडे, पुष्पाताई आत्राम, सुजाता पुनवटकर, वृषाली खानझोडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.