वाघाने फाडला म्हशीचा फडशा; गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पासून 3 किमी अंतरावरील गणेशपूर येथील संतोष एकनाथ बरडे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून फडशा पडला. त्यामुळे बरडे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या दूध व्यवसायावर झाला आहे.

सोमवारी 20 ऑगस्ट रोज नेहमीप्रमाणे म्हशीला गावालगत जंगलात गुराख्याने चरावयास नेली. संध्याकाळी गुराख्याने म्हशीचा कळप गावात आणला परंतु त्या कळपात बरडे यांची म्हैस आली नाही. त्यामुळे संतोषने म्हशीची गावात शोधाशोध केली परंतु म्हैस कोणाच्याही गोठ्यात किंवा गावात आढळली नाही. मंगळवारी पहाटे गावातील जंगलाशेजारी म्हशीला शोध घेण्यासाठी गेले. कोसारा जाणाऱ्या रोडवरील पोचिराम बाबा मठाच्यामागे म्हशीचा मागचा भाग जनावराने खाल्लेला आढळला. म्हशीच्या मानेला पकडल्याच्या व म्हशीच्या संपूर्ण शरीरावर वाघाचे पंजाचे ठशे उमटून दिसत होते.

बरडे यांनी याची माहिती वनविभागाला दिली वनविभाग कर्मचारी पाचभाई व शिंदे यांनी पंचनामा केला. ज्यामुळे खडकी गणेशपूर परिसरात वाघाचे संचार असल्याने जनतेत दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी कोसरा परिसरात वाघ असल्याचे शेतकरी सांगत होते.

संतोष बरडे यानी चार महिन्यांपूर्वी ६० हजाराची म्हैस आणली होती. त्यातून ते दुधाचा व्यवसाय करीत होते. म्हैस सकाळ संध्याकाळ मिळून १०लिटर दूध देत होती. वाघाने म्हशीला ठार केल्याने ६० हजाराचे नुकसान झाले. तरी वनविभागाने बरडे यांना त्वरीत मदत द्यावी अशी मागणी होत आहे .

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.